अभिनय गीत
अभिनय गीत


घोडा पळतोय टप टप टप
तुम्हीही पळा पट पट पट
मांजर बसते दबा धरून
तुम्ही पहा बरं तसं करुन
उंट चालतो हलवीत मान
तुम्ही करा हो तशी कमान
चिमणी उडते भुर्र भुर्र
हात तसे हलवा भरपूर
कुत्रा करतो घराची राखन
तुम्ही पहा बरं तसे भुंकून
चार पायाचे जनावर सारे
तुम्ही ही सारे तसेच चलारे
माकड मारी उडया खूप खूप
करा बरं तुम्ही ही हूप हूप हूप
दोन्ही पायावर उडया मारा
अभिनय गीत हे असे करा