STORYMIRROR

Swarupa Kulkarni

Romance Inspirational Children

4  

Swarupa Kulkarni

Romance Inspirational Children

पाऊस

पाऊस

1 min
272

थेंब थेंब पावसाचे,

आले खिडकीतून आत...

थंड हवेची झूळूक,

स्पर्शून गेली मनास...


पडदा फडफडवून क्षणात,

आला भर्रकन आत...

शिंपडले थेंब वेडे,

मी आनंदले मनात...


गरम गरम कॉफीचा,

सुगंध दरवळला घरात...

मी,कॉफी नी पाऊस,

विरघळलो उराउरी क्षणात...


हलकेच उतरला पाऊस,

खिडकितून सहज घरात,

धरूनी हात माझा,

लेखणी बुडाली निळसर धुक्यात...


निशब्द आस्मानी प्रीती,

गहिवरली मन्मनी क्षणात,

भाववेडी राधिका,

उतरली निळ्या शाईत आज..


तो कैफ मोरपंखी क्षणांचा,

चढला एकांतास आज

मी न उरले वेगळी,

अन् उरला पाऊस तनमनात...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance