पावसाळा
पावसाळा
मनी दाटते काही
थेंब वेडे बघतांना
घालती मण्यांची माळ
हिरव्यागर्द पानांना....
निळा भरला मेघ
करतो भूई ओली
तिच्या कुशीत अंकुरते
नवनिर्माणाची असोशी...
तो मिट्ट काळोख येतो
घेऊन वीजेची नक्षी
आभाळ व्यापते सारे
पक्षी घरट्यात बावरती...
घनगर्द काळोखातं
धरा निःशब्द गीत गाते
तिच्या तनमनात
वाऱ्याचे बोल हलके...
नदीच्या कडेकडेने
तांबूस जाग आली
कळी जागली हलकेच
अतृप्त निशा ओसरली...
तो हलकेच हटला तेथे
किर्र दाट काळोख
दिशा उजळून जाती
प्रतिबींब दिसे पात्रात...
आसमंत झाले स्वच्छ
दिशा झाल्या मोकळ्या
गारवा घाली सादं
पावसाळा सुरू झाला...
