STORYMIRROR

Swarupa Kulkarni

Romance

3  

Swarupa Kulkarni

Romance

थेंब पावसाचे

थेंब पावसाचे

1 min
74

 होऊनी चातक पाहीन मी,

वाट नभात त्या मेघाची,

तृषार्त मन माझे होईल शांत,

पिऊन थेंब अमृताची


स्वर्गामधले अमृतथेंब ते,

जणू धरेवर सरसर येते,

अलगद तिच्या देहावर करते,

सिंचन भरभरून प्रेमाचे


तीही उन्हाने तहानलेली ,

माझ्यासम कासावीस अवघी,

बरसती रिमझीम पाऊसधारा,

मला शांत करूनी तिला शांतवीती...


मी होतो पिऊनी गाढ निवांत,

धरा सारी भिजते ओली,

एकाच वेळी मी नी सृष्टी,

पाऊस करतो तृप्त दोन्ही...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance