STORYMIRROR

Swarupa Kulkarni

Romance

3  

Swarupa Kulkarni

Romance

भेट

भेट

1 min
72

तुझ्या स्पर्शाचा मधुमास

दाटे मनोमनी पहाट धुक्यात

तू दरवळ कस्तुरीचा

मी हरिणी होते काळजात


तूझी मिठी स्वर्ग सुखाची 

मी आठवते दिन राती

तू गंध केवड्याचा

मी फुल पिवळे होई


तूझी माझी भेट चांदराती

कशी विसरेन ती श्रीमंती

तू देखणा मदन रतीचा

मी सुख पाहिले जरतारी


आठवणी दाटून येतात 

पुन्हा पुन्हा मला छळतात 

का? कसे ?दूर झालो सख्या

मन आक्रंदते अनिवार


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance