पाऊस
पाऊस
वाटा चिंब हिरव्याओल्या
डोंगर-दरी हिरवी सारी,
ऋतु श्रृंगारतो दश दिशा
धरा ल्यायली शालू वेडी...
वाटा नागमोडी नदीच्या
वारा वाहे, जळ हाले,
मधुनंच पिवळी फुले
रानं झाले हळदीचे...
निळा मयुर नाचतो
पावसाच्या सरी येतांना,
पावसाने नाद भरतो
सरी धूंदं गातांना...
तहान भागते सारी
धरतीची पाडसांची,
होडी मधुनच गीत गाते
मधूर प्रेमाची सौख्याची..
मेघ तृप्त पाहूनी
धरा तृप्त ही सारी
पायवाटा दूर नेती
प्रियेसह सांजवेळी...
पक्षी चोचित भरती
दाणे कोवळे पिकातले
गीत पावसाळी येई ओठी
तुझ्या माझ्या प्रितीतले..

