प्रिती
प्रिती
1 min
18
धूंदी कळ्या उमलल्या बावऱ्या,
तूला पाहता हासल्या केव्हड्या...
मी खुळा होऊनी पाहतो सखे गं,
हा तुझा गंध पोचला दशदिशा..
तूझ्या मुक्तकेशात गुंतले मन सारे,
प्रिती कोवळी नाहली मन्मनात...
एकांत लाभला हा युगांनी सखे गं,
मी सदा जन्म घेई तुला भेटण्या...
मदन नी रतीची ही जोडी अपुली,
झालो एकरूप सखे तनमनी..
भरूनी प्रेम डोळ्यात पाही मी तुजला,
तू भासे धरती आतूरली पावसा..
तूला भेटण्या वारा वाहतो मंद धूंद,
करी मोकळे बंध रेशमी दोघातले...
सोहळा हा सुखाचा तव मिलनाचा,
एकांती दरवळे गंध प्रितीचा कोवळा..