STORYMIRROR

Swarupa Kulkarni

Inspirational Others

3  

Swarupa Kulkarni

Inspirational Others

तुम्ही होतात म्हणून...

तुम्ही होतात म्हणून...

1 min
61

मी वाचली बाराखडी सारी

तुमच्या काळ्या फळ्यातुनी

रेखिली अक्षरे वळणदार

तुमच्यामुळे पाटीवरी...


तुम्ही होतात म्हणूनी

पुस्तके आम्हा समजली

त्या शेकडो पानांतुनी 

विषयांची ओळख झाली...


शिकून मोठे कसे व्हावे

हे गणित मजला उमगले

गुरूजी तुमच्या बक्षिसाने

स्वर्गच ठेंगणे वाटले....


मराठीशी गट्टी झाली

निबंध कविता धड्यातुनी

मी सदा वाचत गेलो

भाषेची अद्भूत सफर न्यारी...

इतिहास मजला शिवरायांचा

कायम स्मरला जीवनातही

तुम्ही रूजवला भगवा झेंडा

महिमा स्वधर्म क्रांतीचाही ...


इंग्रजी न वाटली कधी परकी

तुम्ही रूजवली गोडी भारी

मी बघा आज सहज बोलतो

बोली जगाची नव्या युगाची...


जरी बोलतो अनेक भाषा 

तरी संस्कृत ही देवभाषा

तुमच्या प्रयत्नाने झाले

संस्कार तियेचे अजोड तेंव्हा..


विज्ञानाची कास धरूनी

सावध ऐकून पुढल्या हाका

मी उभा नवयुगासमोरी हा

गुरूजी ही तुमचीच मनिषा!


भूगोल सारा मजला वाटतो

तळहाती ठेवला तुम्ही सारा

मी पहातो लखलख चंद्र तारे

ओळख त्यांची अचूक मला...


कसे नी केंव्हा फिटतील हे

ऋण तुमचे गुरूजी सारे

मी होतो नतमस्तक आता

शिल्पकार तुम्ही जीवनाचे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational