STORYMIRROR

Dr.Surendra Labhade

Classics

4  

Dr.Surendra Labhade

Classics

मोबाईल

मोबाईल

2 mins
665

शब्द संपले संवाद थांबला विसरले सारे स्माईल,

पारावरच्या गप्पा सरल्या हातात आला मोबाईल


पक्ष्यांचा तो किलबिलाट ऐकू यायचा रानात,

कोकीळेचा मधूर ध्वनी घर करायचा मनात, 


आता सगळे सोबत असतानाही वाटे आहोत वनात,

हातात मोबाईल मान खाली इयरफोन असतात कानात


आजीच्या गोष्टी संपल्या संपली आईची अंगाई,

फेसबुक वरील मित्र आता करू लागले दिरंगाई, 


बांबानाही असते आता कामाची खूप घाई,

मुलापेक्षा मोबाईलडे लक्ष ठेवणारी झाली आई


मामाचे पत्र हरवले,पुन्हा कधीना ते सापडले,

दिवाळीला मामा हल्ली मॅसेज आमंत्रण देऊ लागले


कट्टा, चौक पाराची जागा अतिक्रमणात गेली,

फेसबुक वॉट्स अप ट्विटरने वस्ती आता तेथे केली


मस्ती करणारे मित्र हल्ली ऑनलाईन दिसतात,

समोर भेटल्यावर मात्र बिजी फार असतात, 


दोस्ता,संवगड्या,मित्रा ह्या शब्दांचा झाला ऱ्हास,

हाय,हैलो,हाऊ आर यू हेच शब्द झाले खास


ग्रंथालयातील पुस्तके आता कपाटातच असतात बंद,

कारण हल्ली विवेकानंदाचा मोबाईल हाच झालाय छंद,


मोबाईल मधील लक्ष माणुसकीतही घाला,

भेटेल कुणी जो मित्र आपुलकीने बोला, 


संवादानेच नाते होतात फार घट्ट,

अतिरेकाने मोबाईलच्या करू नका ती नष्ट


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics