STORYMIRROR

Smita Murali

Children Others

3  

Smita Murali

Children Others

प्रकाशातले तारे

प्रकाशातले तारे

1 min
1.0K


आशेचा घेऊन प्रकाश

बना मुलांनो टिम टिम तारे

प्रयत्नांची कास धरुनी

व्हा तुम्ही यशस्वी सारे


अंधार पसरता पहा आकाशी

काळ्या नभी ते लुकलुक तारे

आशेचा घेवून किरण कसे

उजळून टाकी नभांगण पहा रे


प्रकाशातले तारे बनूनी

दाखवा जगाला तुमची चमक

इच्छादिप पेटवून मनाचा

सिध्द करा रे तुमची धमक


खूप हसा नि हसवा जगाला

आनंदाचा वाटा तुम्ही प्रकाश

तुमच्या सहवासात उजळूदे

हर्षानी भरभरुन अवकाश


तुम्ही राष्ट्राचे भविष्य उद्याचे

तुम्हीच सारे आमची आशा

आत्मविश्वासाचा प्रकाश घेवूनी

शोधा नव्या वाटा नव्या दिशा


अंधश्रद्धा अज्ञान अंधःकार

मिटवेल तुमच्या ज्ञानाचा प्रकाश

प्रकाशातल्या ताऱ्यांनो चला रे

उजळून टाका अथांग आकाश!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children