एक कागदी होडी
एक कागदी होडी
1 min
741
बालपणीच्या पावसाची,
एक वेगळीच गंमत असायची...
कागदाच्या होड्यांची,
माझ्या अंगणात गर्दी जमायची...
जुन्या पुराण्या वह्यांची,
पानं टरटर फाटायची...
होड्या झरझर बनवण्याची,
स्पर्धाही मग जुंपायची...
साधी होडी, नांगर होडी,
होडी राजा राणीची...
कल्पनेच्याही पलीकडल्या,
गोष्ट एका आनंदाची...
हरेक होडी वाऱ्यासंगे,
पुढे हळूहळू जाई...
पाऊसही थोडा उसंत घेऊन,
स्पर्धा तयांची पाही...
आजही आठवे पावसासंगे,
ती बालपणीची गोडी...
तुडुंब भरलेलं ते माझं अंगण,
अन एक कागदी होडी...
