कविता तयार होताना
कविता तयार होताना
1 min
183
असं म्हणतात की,
'कविता' या प्रेमातच सुचतात...
आणि प्रेमवेड्या माणसालाही,
प्रतिभावान 'कवी' करतात...
प्रेम तर असं आहे की,
प्रत्येक माणसागणिक बदलतं...
जरुरी नाही की प्रेम फक्त,
माणसावरच करायच असतं...
कधीना कधी जरुर,
प्रेम करावे कुणावरही...
एकतरी कविता नक्कीच जन्मेल,
हि एका नवकवीची ग्वाही...
जडते जेव्हा प्रेम कधी,
खऱ्याखुऱ्या व्यक्तिवर...
जळी स्थळी काष्ठी पाषाणी,
दिसे साऱ्या कवितेभर...
खरच म्हणतात ते की,
प्रेमातच बरच काही सुचतं...
आणि प्रत्येक कविता तयार होताना,
कुणीतरी प्रेम जरुर करतं....
