अढळ
अढळ
1 min
248
काही कविता या उतरतच नाहीत कागदावर,
मनातच घोळत राहतात फक्त...
काहितरी वैर त्यांच नक्कीचअसावं,
त्या कागद आणि पेनाशी...
कदाचित त्यांना यायचचं नसावं प्रकाशझोतात,
कुठेतरी हरवून जाण्याच्या भितीने...
मनाचा एक कप्पाचं जणू भावविश्व त्यांचं,
एका अथांग सागरासारखं...
कागदावर लिहीताना हातही होतात स्तब्ध,
पेनही मध्येच बंद पडतं..
विचारचक्रही थांबत काही वेळ,
पुन्हा सगळचं शून्य शून्य वाटतं...
मग मनही सांगतं असं काहिसं,
कशाला तो अट्टाहास त्या कवितांना कागदावर उतरवण्याचा...
राहू देत ना, त्यांना त्यांच्याच भावविश्वात,
अगदी त्या ध्रुवताऱ्यासारखं अढळ...
