प्रतिबिंब
प्रतिबिंब
एकदा सहजच म्हणाली ती,
एखादी कविता करशील का माझ्यावर?.
कसे सांगू यार तिला की,
आजवर बऱ्याच कविता केल्या आहेत तुझ्यावर....
सांगुन पाहिले तिला हे सारे,
तर ती सुद्धा चकित झाली...
आणि म्हणाली, मग आजपर्यंत एकही कविता,
तू मला का नाही ऐकवली?
मी म्हणालो, ऐकवल्या होत्या साऱ्या कविता,
तुझ्यासोबत साऱ्यांनाही...
साऱ्यांनी एप्रिसिएटही केलं होतं,
पण तू कदाचित शब्दांना नोटीसच केलं नाही....
नसेल ही कदाचित एखादी कविता,
संपूर्णपणे तुझ्यावरती केलेली...
पण एखाद्यातरी कडव्याची मांडणी नक्कीच आहे,
प्रत्येक कवितेत तुझ्यासाठीच केलेली....
खोटं वाटत असेल तर पुन्हा एकदा,
माझ्या साऱ्या कविता काढ वाचून....
खात्रीने सांगतो की एखाद्यातरी कडव्यात,
तुला तुझे प्रतिबिंबच येईल दिसून...

