मैत्रीची नाळ
मैत्रीची नाळ
1 min
270
तुझ्या माझ्या नात्याला,
एक वेगळीच झालर मैत्रीची....
ज्यात कधीही नसते,
Sorry, thank you ची formality....
मैत्रीचं नातंच, इतर नात्यांपेक्षा,
किती वेगळ आहे.....
अपेक्षांच्या ओझ्याविना इथे,
सर्व काही सुरळीत आहे....
आनंद द्विगुणित करावा,
तर आपल्या मैत्रीत....
आणि दु:ख पण share करावं,
तेही आपल्याच मैत्रीत.....
आपल्या या नात्याला,
लागो ना नजर कुणाची....
आणि उत्तरोत्तर वृद्धिंगत व्हावी,
नाळ आपल्या मैत्रीची.....
