उकल
उकल
प्रेम व्यक्त करायचयं तर,
पाहिजे कशाला फक्त एकच दिवस...
अथांग सागरासारखे आहे ते,
अनुभवावं प्रत्येक दिवस....
अडिच अक्षराच्या प्रेमाची व्याख्या काही,
एका दिवसात संपणारी नाही....
आणि संपूर्ण आयुष्यभर शोधुन सुद्धा,
त्याची व्याप्तीच कळत नाही.....
मर्यादेच कुठलच बंधन नाही याला,
म्हणुन प्रेम करावे कुणावरही....
चूकीचा जराही लवलेश नसावा,
पण असावे निखळ, निर्मळ तरिही.....
प्रेम हि संकल्पनाच एवढी मोठी कि,
त्याची उकल एका जन्मात तरी शक्य नाही..
आणि खरच, हे प्रेम जाणुन घ्यायचचं झालं तर,
कोणास ठाऊक? दुसरा जन्म मिळेल कि नाही....

