कोण तू ?
कोण तू ?
1 min
255
नानाविध रूपे तुझी,
कधी भगिनी, कधी माउली...
तू प्रेयसी, मैत्रीण कधी,
भार्या कधी, माझी छकुली ...
शक्ती तू, भक्ती कधी,
विद्येचीही देवता...
रणरागिणी अंगार कधी,
माया अन ममता...
ना अबला तू परावलंबी,
जरी क्षणोक्षणी कसोटी...
वंश दिव्याही लाजवणारी,
जणू घराची नितळ पणती...
निसर्गचक्रही अडते सारे,
तुझ्यावाचूनी अवघ्या जगी...
म्हणून
भ्रूणहत्या त्या रोखुनी साऱ्या,
जन्मावी घरोघरी मुलगी...
