आमच्या शाळेतही होते एक....
आमच्या शाळेतही होते एक....
२३ जुलै २०१६ रोजी आमचे 'सुनील महाडिक सर' आमच्यातून गेले. खूप वाईट वाटलं. एक शिस्तप्रिय व्यक्तिमत्व हरवलं. 'शिट्टी' कायमची शांत झाली. खरंतर सरांचा सहवास मला जास्त मिळाला नाही, पण एकदा त्यांच्या हातचा मार मात्र खाल्ला होता. त्यांच्या अचानक जाण्याची बातमी कळली, तेव्हा मनात असूनही त्यांच्या अंत्य दर्शनाला सुद्धा जाता आलं नाही आणि का कोणास ठाऊक! नकळत दादरच्या वीर कोतवाल उद्यानात बसून एक हाती हि कविता तयार झाली... कदाचित हिच सरांसाठी शेवटची आदरांजली असावी माझ्याकडून आणि कदाचित माझ्या सारखीच भावना त्यांच्या प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये होती म्हणूनच कि काय हि कविता तेव्हा प्रत्येकाच्या wall वर झळकली होती आणि काही दिवसांनी शाळेच्या स्मरणिकेत...
काही चूक झाली असल्यास माफ करा.
*************
प्रत्येक शाळेत एकतरी,
असं व्यक्तिमत्व दिसतं...
जे शाळेतल्या साऱ्या मुलांना,
'शिस्त' लावत असतं...
आमच्याही शाळेत होते,
एक 'महाडिक सर' असे...
बेशिस्त्याच्या पाठीवर,
एकतरी 'धबाका' जरुर बसे...
सुविद्याच्या शिस्तीमध्ये,
सरांचा मोलाचा वाटा होता...
त्यांच्या एका शिट्टीच्या ईशाऱ्यावर,
MCC platoon हलत होता...
Sports day ची Line तोड तर,
फक्त सरांनीच म्हणावी...
कबड्डीच्या मैदानावर मग,
सरपंचगिरी करावी...
'तीन कोमी' नाऱ्यांचाही,
आवाज सदा बुलंद असे...
पुढच्या सूचनेसाठी mic नेहमी,
सरांच्याच हाती वसे...
कदाचित मैदान हीच सरांची,
आवडती जागा असावी...
आणि रुजावी प्रत्येकात थोडीतरी शिस्त,
हि एकच ईच्छा मनी असावी...
पण, आज हे सारं काही मागे टाकून,
सर, तुम्ही हे जगच सोडून गेलात...
साऱ्या साऱ्या विद्यार्थ्यांसोबत,
त्या 'शिट्टी' लाही पोरकं केलात...
आज अचानक या वाईट बातमीने,
सारंकाही चटकन डोळ्यांसमोर आलं...
आणि जुन्या काही आठवणींना मागे ठेवून,
एक व्यक्तिमत्व धूसर होत गेलं...
