निसर्गचक्र
निसर्गचक्र
अवकाळी पावसाने,
सारं सारं काही बदललयं....
साथीच्या रोगांना जणू,
खास आमंत्रणच दिलयं...
पडतोय थंडीत पाऊस,
तर कधी उन्हाळ्यात सुद्धा पडतोय....
स्वत:च्या प्रत्येक चाहुली सोबत,
काहितरी अघटितचं घडवतोय....
होतेय पिकांची नासधूस,
ऐन भरात येताना....
कोकणचा राजा सुद्धा रुसून बसतोय,
देशी- परदेशी जाताना...
नष्ट होताहेत फळबागा,
अचानक गारपिटीने....
शेतकरी सुद्धा होतोय हवालदिल,
या निसर्गाच्या कोपाने.....
अन्नधान्याची गरजसुद्धा,
अपुर्ण राहतेय बहुतेकदा....
पाण्यासाठी सुद्धा होतेय वणवण,
इथे तिथे सर्वथा....
झाडांच्या कत्तलीचा परिणाम,
प्राणवायू वरही होतोय ...
बाटलीतल्या शुद्ध पाण्यासारखा,
आता तर cylinder मध्ये भरला जातोय...
निसर्गाचाच होतोय इतका ऱ्हास,
कि सारं कालचक्रच बदललयं...
सजीवसृष्टिच्या नाशाचं जणू,
पहिलं पाऊलच पडलयं....
Global warming ची झळ,
जेव्हा पोहोचू लागलीय सर्वांना....
उपायही तयार आहेत सारे,
आता भेदू सर्व आव्हानांना....
या साऱ्या आव्हानांना रोखण्यासाठी,
आपणच करायला हवयं काही...
एक पाऊल जाणिवता आणि जागरुकतेचं,
आपल्या लाडक्या 'वसुंधरेपायी'...
आपल्या चांगल्या प्रयत्नांनी,
हि वसुंधरा अशी काही बहरेल....
कि सजीव सृष्टिचे जीवन पुन्हा,
सफल संपुर्ण करेल....
