STORYMIRROR

vanita shinde

Children Stories

4  

vanita shinde

Children Stories

52आठवडे लिखाण आव्हान स्पर्धेसा

52आठवडे लिखाण आव्हान स्पर्धेसा

1 min
323

चिवू ताई चिवू ताई

का करते चिवू चिवू,

देते तुला खाऊ मी

चल खेळाया जावू.


आली आपल्या मागून

गुपचुप मनी माऊ,

म्हणे कशी लाडाने

तुमच्या सोबत येऊ!


काव काव करत

उडत आला कावळा,

लुटूलुटू धावत मग

आला मोती भोळा.


टूनुक टुनूक उड्या

उंदीर मामा घेई,

कोप-यामागे लपून

हळूच आवाज देई.


लपाछपी खेळायला

चला सर्वांना भेटू,

गंमत जंमत भारी

मजाच मजा लुटू.


साहित्याला गुण द्या
लॉग इन