शिस्त....!
शिस्त....!
सुट्टीतील शिस्त पुराण...!!!
सुट्टी म्हंटलं की आनंद होतो
नाहीतर वैताग तरी येतो
शिंग फुटली की अक्कल येते
तेव्हा मात्र शक्कल सुचते
स्वच्छता अभियान अंगी भिनते
शिस्तीचे वारे कानात शिरते
दार बंद खिडकी बंद
आम्ही आमच्या कामात दंग
हा हा म्हणता कपात ओकते
पोटात किती ते तेव्हा कळते
पाहून सारे नजर भिरभिरते
जर कमी चक्कर येते
आईची वट वट आणि
सांगतील बाबांची कट कट
वादा वादी अन डोक्याला त्रास
नको होतो फुकाचा वनवास
पोटात भूक जाते सुख
केविलवाणे होते क्षणात श्रीमुख
आईची हाक जेवणासाठी
बाबांची दमदाटी आवरण्यासाठी
जमवले सारे हवे हवे वाटते
पुन्हा परत मग सारे साठते
बाहेरचा रस्ता आई दाखवते
बाबांना पण ते कुठे पटते
शेवट गोड करायचा असतो
आमचा मात्र इथे जीव जातो
तरीही आम्ही कंबर कसतो
सारे सावरून मगच स्वस्त बसतो....!!!
इति शिस्त पुराणं.....!
