STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Children Stories

4  

नासा ( NaSa ) येवतीकर

Children Stories

मामाचे गाव

मामाचे गाव

1 min
798

मामाचे गाव 

आहे छान

भेटतो सारे

होऊन लहान


मामाचे गाव

आहे लहान

लोकं सारी 

आहेत महान


मामाचे घर 

अगदी लहान

खेळायला मोठे 

अंगण छान


मामाच्या घरची

मिरची भाकर

सोबत मिळतसे

गुळ अन् साखर


मामाच्या घरी 

दिवा वातीचा

तरी ही शोभून 

दिसतो रात्रीचा


मामाच्या घरात 

नाही मुळीच टीव्ही

एकमेका संवाद

दुसरा पर्याय नाही


मामाच्या घरी आहे

मोठा काळा कुत्रा

चोरांना पळवून लावी

नव्हता मुळीच भित्रा


मामाच्या घरात

छोटेसे मनीमाऊ

दूध पिताना झालो

आम्ही भाऊ भाऊ


मामाचे गाव

आहे दूरदूर

जाताना मनात

नेहमी हुरहुर


मामाचे गाव

माझ्या मनात

कोरून ठेवलंय

हृदयाच्या कप्प्यात


मामाचे गाव

आवडते भारी

बालपणीचे मित्र

भेटतात सारी 



Rate this content
Log in