मित्र बनवू या
मित्र बनवू या
1 min
194
नव्या आशा, नवनवे विचार
नववर्ष शुभेच्छा करा स्वीकार
झाले गेले विसरूनी
मरगळ सारे झटकुनी
उद्याचे स्वप्न करू साकार
नववर्ष शुभेच्छा करा स्वीकार
विद्येची सदा आस धरु
नव्या कलेचा अभ्यास करू
नवजाताला देवू आकार
नववर्ष शुभेच्छा करा स्वीकार
वैर संपवू नि मित्र बनूया
सुखदुःखात एकत्र येऊ या
करू या आत्ता बरा आचार
नववर्ष शुभेच्छा करा स्वीकार