शुभ दीपावली
शुभ दीपावली
1 min
177
दारांच्या कमानी बांधून
झेंडूच्या फुलांचे तोरण
साजरी करूया आपण
आनंदात दिवाळी सण
अनारसे लाडू करंजी
स्वाद घेऊ फराळाचा
अंगणात दिवे लावूनी
उजेड करू प्रकाशाचा
वर्षातून एकदाच येतो
असा हा आनंदा क्षण
सर्वांनाच हवासा वाटतो
असा हा दिवाळी सण
सर्वाना लागलेली असते
खरेदी करण्याची लगबग
यासाठी मात्र गरीब मायबाप
किती करतात तगमग ?
