STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Others Children

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others Children

निसर्ग सहल

निसर्ग सहल

1 min
139

मित्राच्या आग्रहास्तव गेलो

शेतात ठाळ भाजून खायला

सोबत होता जेवणाचा डबा

दोन बाटल्या पाणी प्यायला


रस्त्याने जाताना झाल्या गप्पा

अन गोष्टीचा आला होता पूर

बोलता बोलता शेत कधी आले

कळलेच नाही आलो किती दूर


महादेवाच्या मंदिराच्या बाजूला

बसलोत सर्वजण जेवायला

भाकर भाजी भात ठेचा दही

हेच पंचपक्वान होतं खायला


शेतात फिरलोत इकडे तिकडे

साऱ्यांचे जेवण आटोपल्यावर 

ठाळ उपटलं आणि जाळ केलं

खाण्याची मजा आली भाजल्यावर

 

निसर्ग सहलीची मजा आली

सुट्टी कशी संपली कळलेच नाही

घरात बसून कंटाळलेली सारेजण

सहलीत मात्र काही कंटाळले नाही



Rate this content
Log in