शाळा
शाळा
1 min
390
शाळा आमची खूपच छान
दिसणार नाही कुठेच घाण
परिसर स्वच्छ असे शाळेचा
बंधन पाळतो आम्ही वेळेचा
शाळेच्या आरंभी परिपाठ
प्रार्थना म्हणतो तोंडपाठ
बरोबर दहाच्या ठोक्याला
सुरुवात होते अभ्यासाला
गुरुजी आमचे खूपच हुशार
देत नाहीत आम्हाला मार
गुरुजी शिकवती विसरून भान
अभ्यासात आम्ही रममान
वेळ होता एक वाजताची
आठवण झाली जेवणाची
साबणाने धुतले स्वच्छ हात
ताटात घेतला वरणभात
दुपारच्या वेळी विविध खेळ
कळेना कधी संपला वेळ
चार वाजता वाजते घंटा
आम्ही करतो बाय-बाय टाटा