STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

दिवाळी

दिवाळी

1 min
419

कोंबडा आरवला

सकाळ ही झाली 

अभ्यंगस्नानाची

पहा वेळ झाली


साबणाचा फेस

सुंगंधी उटणे

सारी मुले गाती

आनंदाचे गाणे


दिवाळी पाडवा

मनात गोडवा

चकली बुंदी खारा

मजेशीर खावा


दिव्यांनी उजळे

सारा परिसर

रोषणाईने दिसे

धरा ही सुंदर


नवा पेहराव

मनी नवा हर्ष

सुखी समाधानी

जावो नवा वर्ष


पूर्ण होवो आपल्या

आकांक्षा नि इच्छा

आपणा सर्वांना

दिवाळीच्या शुभेच्छा


Rate this content
Log in