STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Others Children

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others Children

थंडीचा महिना

थंडीचा महिना

1 min
156

संपला हा पावसाळा

आला आला हिवाळा


कुडकुडे सारे अंग

मफलर येती संग


कोवळे ऊन सकाळी

रात्रीला लागे शेकोटी


गरमा गरम खाणे

मग कुशीत झोपणे


उठणे नको नकोसे

चहाचा कप हवेसे


असा थंडीचा महिना

आवडते सर्व जना


साहित्याला गुण द्या
लॉग इन