लहान मूल
लहान मूल
1 min
172
लहान लहान मूल
जणू गुलाबाचं फुल
स्वतःकडे आकर्षून घेणारं
सर्वांना आनंद देणारं
लहान मुलांची संगत
जीवनाला येई रंगत
इंद्रधनूच्या रंगाप्रमाणे
सप्तरंगी जीवन गाणे
लहान मुले खळाळता झरा
फुलवितो हास्याचा फवारा
विसर होई सर्व दुःखाचा
चेहरा खुलेल आनंदाचा
निरागस ही मुले लहान
संगतीने दिवस सरतो छान
