बडबडगीत
बडबडगीत
1 min
695
लबाड आमचा बोका,
कायम देतो धोका,
दूध करतो फस्त,
ऐटीत चालतो मस्त ll1ll
छोटी नाजूक चिऊताई,
कायम तिला भलतीच घाई,
दाणे टिपते पटपट,
उडते कशी सटसट ll2ll
हुशार आमचे पोपटराव,
चोंच त्यांची बाकदार,
खायला आवडते पेरूची फोड,
मिरची लागते त्यांना गोड ll3ll
मनीमाऊ लबाड फार ,
उंदरावर करते अचूक वार,
तिचा फक्त एकच नारा,
राग आला कि नखे मारा ll4ll
ससोबा मऊ गोंडस जरी,
स्वभाव त्यांचा भित्रट भारी,
मोठे मोठे त्यांचे कान,
लाल डोळे शोभतात छान ll5ll
