STORYMIRROR

Sushama Raut

Others

3  

Sushama Raut

Others

वाईट स्वप्न

वाईट स्वप्न

1 min
364

स्वप्ने हि स्वप्नेच असतात,

कधीतरीच सत्यात उतरत असतात ,

मनाच्या नाजूक पडद्याआड ,

आपले विश्व जपत असतात ll


स्वप्न म्हणजे सत्य नाही ,

याची असूनही कल्पना,

स्वप्नांच्या जगात बागडून ,

आपणच चिरडतो आपल्या भावना ll


अशाच एका स्वप्नाने,

जीवन पार ढासळले ,

कधीही न विसरणारे,

दुःख जीवनात विखुरले ll


फुलपाखरे स्वछंद विहरत होती,

पक्षी कुंजन करीत होते,

नदीकाठी बसून एकटी,

वाट त्याची पहात होते ll


रमले होते आठवणींच्या विश्वात,

सकाळ सरली आली संध्याकाळ,

सतत त्याच्या येण्याचा भास,

मुखात त्याच्या नावाची जपमाळ ll


घरट्याकडे परतले खग,

मनाची होऊ लागली तगमग,

सकाळ झाली स्वप्न भंगले,

मनावर दुःखाचे सावट उरले ll



Rate this content
Log in