Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sushama Raut

Others

3  

Sushama Raut

Others

बालवाडीतील पहिला दिवस

बालवाडीतील पहिला दिवस

1 min
291


बालवाडीतील दिवस पहिला,

माझ्या कायम लक्षात राहिला,

नवीन शाळा, मित्र नवीन,

तरी आठवत होती बहीण ll १ ll


दोन तास बसायचे कसे,

डोळ्यातील पाणी थांबत नव्हते,

सर्वांचीच अवस्था माझ्यासारखी,

सगळेच दुःखी दिसत होते ll २ ll


खाऊ-खेळणी,

कशातच रमत नव्हते मन,

शाळा-बाई

जणू बनले होते रण  ll ३ ll


हळूच माझ्याकडे आल्या बाई,

पाहून माझी अवस्था,

वाटत होते सांगावे त्यांना,

दाखवा मला घरचा रस्ता ll ४ ll


बाई मात्र फारच हुशार,

विचारले काय आवडते तुला,

क्षणाचाही विचार न करता,

म्हटले गुलाब प्रिय मला  ll ५ ll


कुठून कशी माहित नाही

बाईंनी आणली गुलाबाची कळी,

पाहुनी ते सुंदर फूल,

माझ्या गाली उमटली खळी ll ६ ll


Rate this content
Log in