STORYMIRROR

Sushama Raut

Romance

4  

Sushama Raut

Romance

प्रेम

प्रेम

1 min
272

तू बरेचदा भेटत होतास,

कारण काढून हसवत होतास,

मनाला आनंद देत होतास,

खास असल्याचं भासवत होतास ll


एक दिवस काही वेगळेच घडले,

तुझ्यापासून नजर लपवू लागले,

अचानक मन घायाळ झाले,

हृदयाचे ठोके वाढू लागले ll


गालवर येऊ लागली लाली,

तुझ्या नुसत्या विचाराने,

भेटलास तेव्हा पहात होते,

तुला तिरक्या नजरेने ll


ध्यानी मनी फक्त तुझा विचार,

तरीही तुला भेटण्यास नकार,

तुझ्याच विचारांची बहार,

जीवनास माझ्या दिलासा आकार ll


प्रेम म्हणजे हेच असते,

उत्कटता, आनंद आणि बरेच काही,

तू केव्हा माझा झालास,

हे मला कळलेच नाही ll


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance