भीती
भीती
वाटते सतत राहावे जिंकत,
म्हणून असते सतत झटत,
कष्टांची होऊ नये माती,
हरण्याची मला वाटते भीती ll १ ll
कायम मन खंबीर करत,
झेलते मनावर दगड ठेवत,
समाजाच्या सर्व रीती-भाती,
हरण्याची मला वाटते भीती ll २ ll
सगळेच सैरभैर असतात धावत,
समाजातील पाप नाही पाहवत,
पैश्यावर अवलंबून सर्व नाती
हरण्याची मला वाटते भीती ll ३ ll
मेहनत म्हणजेच देव ,
असे स्वतःलाच समजावत,
कष्टांच्या मी पेटवते वाती,
हरण्याची मला वाटते भीती ll ४ ll
या जगण्यावर करावे प्रेम,
कधी निष्प्राण होऊ याचा नाही नेम,
विचारानेच धडकते छाती,
हरण्याची मला वाटते भीती ll ५ ll
