Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Chandrakant Dhangawhal

Tragedy Others Children

4  

Chandrakant Dhangawhal

Tragedy Others Children

कुठे.हरवले बालपण

कुठे.हरवले बालपण

1 min
572


भातुकलीचा खेळ आठवला की

आठवते बालपण

बालपणीच्या गंमती जमतीने

खुलते किती मनं

आता आठवणी आठवल्या की वाटते

किती छान असते बालपण


नाही शाळा नाही अभ्यास

खुप खुप फिरायचे

चोरून लपुन न विचारता चिंचा आवळे खायचे

नाही कुणाचा धाक नाही कुणाचे बंधन 

हाणामारी करायला नव्हते कुणाचे दडपण

किती छान असते बालपण


हट्ट असायचा बाबांकडे

आई द्यायची खाऊ

खाऊ लपवताना

दादा म्हणायचा

आली बघा माऊ

आपडीथापडी 

पळापळी करताना

फुटायचा किती रांजण

मजा मस्ती खेळ खेळता

असायचे रोज भांडण

खरच किती छान असते बालपण


खेळणीसाठी बाबांजवळ रडायचे

नट्टापट्टा करताना

आईचे धपाटे खायचे

तोडफोड पसारा करायला

नसायचे कुणाचे बंधन

टिकली पावडर लावताना

मस्त हसायचा दर्पण

खरच किती छान असते बालपण

 

आता जग बदलले माणूस बदला

व्हाट्सएपच्या काळात

मोबाईलमय झाला

भेटीगाठी हसणे खेळणे

विसरून 

नेटचॅटींग मधे अडकला

नाही कुणाचा धाक 

नाही कुणाचे राहिले बंधन

माणसा माणसात अंतर वाढले

राहिले नाही आपलेपण


आई बाबा असतानाही 

सोबत कोणी खेळत नाही 

अवतीभोवती फिरतानाही 

जवळ कोणी घेत नाही

नाही जिव्हाळा नाही ममता

राहिले नाही घरपण

या मोबाईलच्या नादात विसरून गेले अंगाई

पाळणा घरात जाते बालपण


आई बाबा नसतात घरी 

घर असते सुने सुने

सगळकाही असुनही

सारकाही असते उणे

सुख दुखाच्या गप्पा नसतात 

करत असतात तू तू मै मै 

समजुन सांगाव कुणाला

काहीच कळत नाही

खरच सांगतो

भातुकलीच्या खेळामधे

आता लागत नाही मण

काय सांगावे आता

कुठे हरवले बालपण



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy