उध्वस्त होतोय तरी
उध्वस्त होतोय तरी
उध्वस्त होतय तरी ही माणूस,
आपल्याच तोऱ्यात नाचतोय,
टाळी थाळी वाजवता वाजवता,
आपल्या आयुष्याचा शेवट मोजतोय,
का इतका अहंकार आणि माज ,
आयुष्यभर तो करायचा कशासाठी,
ना अग्नी द्यायला भेटे वंशाला,
ना साडेतीन हात जागा शवासाठी,
विकाव म्हणतो सारच काही तू,
देश विकला तस टाकाव विकून,
स्मशान देखील बघ जमलच तर तुला,
पण शेवटा साठी जागा गड्या ठेव थोडी राखून,
उद्ध्वस्त होतोय माणूस येथे,
आणि शहरे ओस पडु लागलीत,
निरव शांतता भासते जगात,
आणि स्मशाने बोलु लागलीत,
हि वेळ आहे आज आमची,
जाईल ति ही अशीच निघून,
बघू आम्ही तुला कोण खांदा,
देतोय तेच आम्ही मागून,
आपल्याच कर्माची फळे आत्ता,
पृथ्वीवर भोगावी लागत आहेत मानवाला,
नाही वाटत या भुमीवर येवून,
रहाव अस कधीच त्या दानवाला,
कित्येक दा मानवाने घाव घातला,
बघा त्या निसर्गाच्या मुलांवर,
आणि म्हणूनच कोरोना आज येवून,
बसलाय या मानवाच्या कुळावर,
जीवंत माणसे नेहमीच धोका देतात,
पटतंय मनाला आत्ता कुठंतरी,
कंफनात गुडांळलेला शव सांगा,
आपनास धोका देईल कसा बरी,
ज्यांच्या वर श्रद्धा ठेवली मी,
आज पाठ त्यांनीच फिरवली आहे,
माझ्या कुंडलीतील सर्पदोष सांगणाऱ्यांनी,
कोरोनाची वॅक्सिंग दंडात लगावली आहे,
सांगा मग विश्वास आत्ता मी ठेवू कसा
त्या तुझ्या गाभार्यातल्या देवावर ,
येवढ्या तुझ्या निःसीम भक्तीत,
त्यान काय केलं तुझ्या नावावर,
ज्याला पांडु म्हणून हिणवलस,
तोच तुझा आज पांडुरंग झाला,
कचरा वेचणारा सफाई कामगार,
तु संकटात आसतांना धावून आला,
सोडून चाललेत आपलेच तरी,
मानव अजुनही हरला नाही,
लोप होत चालला मानव जातीचा,
तरी मानवाने त्याचा मीपणा सोडला नाही,
उध्वस्त मनाच्या या गाभाऱ्यात,
सांग का पुजतोस त्याला तु दिनरात,
मानवतेच्या या मंदिरात जप तू,
नित्यनेमाने माणूसकी हीच जात,
मुक्या भावनांना आवर आता,
मधुर वाणिने सावर आता,
क्षणभंगूर या जीवनात तू,
द्वेष मत्सराचा कर त्याग स्वतः,
का चिंता तुला मरणाची ,
त्या सरणावर जळण्याची,
जप माणूसकी या जन्मात,
मोक्ष मिळेल रे चारधामात,
बेवारसपणे जळताना तो शव,
हळुवारपणे स्वताशीच बोलला असेल,
माझ्या पाठीमागे खरंच का या सृष्टीत,
माणूसच माणसाठी उरला असेल,
