Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Raj Mohite

Romance Tragedy

3  

Raj Mohite

Romance Tragedy

Bord Exam

Bord Exam

2 mins
281


वर्गातील प्रिया आवडायची खरं

कधी वाटायचे बोलू

कधी न बोललेच बरं 



ती नसली तर

वर्ग सुना-सुना असायचा

तिची सुट्टी मला

वर्गात तुरुंगवास भासायचा

माहिती हवी म्हणून

तिच्या चौकावरं

कधी वाटायचे बोलू

कधी न बोललेच बरं 

वर्गातील प्रिया आवडायची खरं 



फलकावर कमी

जास्त तिच्यावर ध्यान

गणिताच्या जोडीला

नाही सुटला विज्ञान

कधी नापास कधी पास

कधी काठावरं

कधी वाटायचे बोलू

कधी न बोललेच बरं

वर्गातील प्रिया आवडायची खरं 



तशी ती ही बाहेर

बघून हसायची

वर्गात असली तर

ठेंगा दाखवायची

तिही थोडीशी

मरायची माझ्या वरं

कधी वाटायचे बोलू

कधी न बोललेच बरं

वर्गातील प्रिया आवडायची खरं 



सगळेच मित्र

चिडवायचे मला

माझे तिचे नाव लिहून

रडायचे तिला

चिडायचो खूप

जिवलग मित्रांवरं

कधी वाटायचे बोलू

कधी न बोललेच बरं

वर्गातील प्रिया आवडायची खरं 



कधी बोलायची

कधी रूसायची

काही चुकले माझे

तर शांत बसायची

चिडवण्या मारले पेपरं

कधी वाटायचे बोलू

कधी न बोललेच बरं

वर्गातील प्रिया आवडायची खरं 



प्रेम प्रकरणात

पास झालो

विज्ञान सुटले गणितात

नापास झालो

पुन्हा कधीच

नाही भेटली त्याच रस्त्यावरं

कधी वाटायचे बोलू

कधी न बोललेच बरं

वर्गातील प्रिया आवडायची खरं 



वर्षे लोटली

खुप बदल घडले

संसाराचे ओझे तिच्या

खांद्यावर पडले

काल ती दिसली

पण लपवून नजरं

कधी वाटायचे बोलू

कधी न बोललेच बरं

वर्गातील प्रिया आवडायची खरं 



आता दिसते रोज

पण बोलते कमी

मी बोलतो जास्त

ती ऐकते कमी

अगोदरच का नाही बोललो 

सारे सविस्तरं

कधी वाटायचे बोलू

कधी न बोललेच बरं

वर्गातील प्रिया आवडायची खर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance