STORYMIRROR

Raj Mohite

Romance Fantasy Others

3  

Raj Mohite

Romance Fantasy Others

फर्स्ट रेन

फर्स्ट रेन

1 min
250

देवा पहिला पाऊस

तिच्या सोबत पडू दे,

सारा बेत माझा

मनासारखा घडू दे।। 


विजांनी कहर

ढगांनी गजर करावा,

थेंबानी सडकावे

वाऱ्याने पदर उडवावा,

बस क्षणात तिची नजर भिडू दे,

देवा पहिला पाऊस

तिच्या सोबत पडू दे।


पाऊस भिजव

ढगा भिती दाखव जराशी,

विजा करा कडकडाट

म्हणजे बिलगेल उराशी,

साथीने तुमच्या तिचा थरकाप उडू दे,

देवा पहिला पाऊस

तिच्या सोबत पडू दे।।


बाहुपाशात येता

भिती होउदे तिची दुर,

होता टक्कर नयनांशी

लाजुन होउदे चुर,

भलतीच नशा तिला मला चढू दे,

देवा पहिला पाऊस

तिच्या सोबत पडू दे।।


केस सैल झाले

मिठी घट्ट झाली,

जसे हात गळ्यात गोवले

नशा दुपटट झाली,

सारे बंध आज तिनेच तोडू दे,

देवा पहीला पाऊस

तिच्या सोबत पडू दे।। 


पावसाने जोर धरला

लगाम धरली वाऱ्याने,

विजांनी चित्र टिपले

प्रकाशाच्या माऱ्याने,

पुकारले युद्ध ओठांनी त्यांना लढू दे,

देवा पहिला पाऊस

तिच्या सोबत पडू दे।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance