Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Raj Mohite

Romance

3  

Raj Mohite

Romance

खेळ नयनांचा

खेळ नयनांचा

1 min
263


तुझ्या नयनांचा खेळ मला कळलाय सारा,

नको येउस जवळ तुझा श्वास भासे सोसाट्याचा वारा ।।


मन कोमल ग माझे

नको छेडुस तू त्याला ,

नको पाहूस रोखून

घाव होतो ह्या जिवाला ,

आता उठव ग तुझ्या नयनांचा हा पहारा,

तुझ्या नयनांचा खेळ मला कळलाय सारा,।।



तुझ्या हातातील हात माझा

मला घातकी का वाटे ,

क्षणा पुर्वीचा स्पर्श

आता टोचतो का काटे ,

तुझी व्याकूळ नजर आता शोधती सहारा,

तुझ्या नयनांचा खेळ मला कळलाय सारा,।।



तू झालीस बेभान

मला भान आहे सारे ,

नको करुस स्पर्श

येती अंगावर शहारे ,

नको करुस ओठांनी बेधुंद इशारा,

तुझ्या नयनांचा खेळ मला कळलाय सारा,।।



वागणं तुझ 

असा एक बहाना ,

शब्द शब्द तुझा

मला सांगतो हुकाणा ,

कसे सुटेल हे कोडे फसला जिव हा बिचारा,

तुझ्या नयनांचा खेळ मला कळलाय सारा,।।



अवस्था हि माझी

जशी सागरी वादळात नाव ,

नाही मार्ग वाचण्याचा

सांग कोठे मी बुडावं ,

नाही आशा सुटण्याची पदरी तुच एक किनारा,

तुझ्या नयनांचा खेळ मला कळलाय सारा,।।


Rate this content
Log in