पाऊस मला खूप काही सांगून गेला
पाऊस मला खूप काही सांगून गेला
मी ना आजकाल ,
पावसात जाऊन रडत असतो ,
तेव्हा मी माझ्या आसवांना जागा करून देत असतो ,
जेणेकरून ओघळले ते अश्रू माझे ,
कुणालाच तुझ्या आठवणीत रडत आहे ,
असे वाटले नाही पाहिजे ........
खरच पाऊस मला खूप काही सांगून गेला .
मी आजही पावसात भिजत राहतो ,
तुझ्या आठवणीत ......
मी माझ्या हातानाच मिठी मारतो ,
कारण तू असल्याचा भास मला आजही होतो ...…...
खरच पाऊस मला खूप काही सांगून गेला ...
जेव्हा तू असायची तेव्हा ,
कधीही वीज कडकड करायची ,
भीती पोटी तू मला घट्ट मिठी मारायची .......
खरच पाऊस मला खुप काही सांगू न गेला ..
तुझ्या त्या थरथरणाऱ्या अंगाची मला ,
ऊब जाणवत होती .......
मला गारवा लागतच नव्हता ..
कारण तो गारवा तू केव्हाच घालवून टाकायची ......
तू ओठ थरथरत बोलायची ,
माझे लक्ष बोलण्या कडे राहतच नव्हते .....
त्या थरथरणाऱ्या ओठांना मी शांत करून ,
द्यायचो ........
खरच पाऊस मला खूप काही सांगून गेला ..
त्या पावसाने पण माझ्याशी दगा केला,
आजकाल नेहमी पडतो ...
पण तू नसते .....
मला तू नसण्याचा भास नेहमी करून देतो .......
मला माहित नाही ,
तू सुद्धा पावसात भिजत असशील ......
पण तुला माझी आठवण येईल ,की नाही ,
हे सुद्धा त्या पावसालाच माहीत .???
मी माझ्या डोळ्यात अश्रू साठवून ठेवत असतो ,
त्या पावसाची आठवण नेहमी करीत असतो ........
जेव्हा पाऊस येतो ,
तेव्हा कुठे मी अश्रूंना मार्ग मोकळा करून देत असतो ..................
मी अश्रूंना सुद्धा रागाने बोलत असतो ,
जा तुम्ही ही पावसा सोबत मला सोडून ...
जशी ती गेली .........
खरच पाऊस मला खूप काही सांगून गेला .....

