शाळेतील विस्मृतीतले क्षण
शाळेतील विस्मृतीतले क्षण
अचानक काल सर
बाजारात मला भेटले
पाठीवर त्यांनी थांब दिली
कसा आहेस तू विचारले
पाहतच राहिलो क्षणभर
त्यांना मी नाही ओळखले
वय त्यांचं वाढलं होतं
शरीर त्यांचे थकले होते
क्षणभर थांबलो नी चमकलो
ते आमचे गणिताचे सर होते
बघताच त्यांना शाळा आठवली
शाळेत सरांचे खुप धाक होते
शाळेचे पटांगण पटांगणात गवत
गवतावर बसली ती दिसली
मला बघायची बघून लाजायची
कशी ती माझ्या प्रेमात पडली
बाजूला वर्ग वर्गाला खिडकी
खिडकीत बसला मित्र आठवला
जिवलग होतो दोघे आम्ही
ठाऊक आता तो कुठे हरवला
बोलत होते सर माझ्याशी
मी शाळेच्या विस्मृतीत गेलो
आठवले ते क्षण आज नव्याने
एकदा पुन्हा ते जीवन जगलो
