ती
ती
1 min
720
सदैवं नांदते तुमच्या घरात
ती आणि तिचं मन असते
साफसफाई निष्ठेने करते
नीट घराची ठेवणं असते
मोल भाव वस्तूंचा करते
चोख पैशांचा हिशोब ठेवते
काटकसर ती घरात करूनी
आम्हास नवीन वस्तू आणते
ताजा स्वयंपाक आम्हा वाढते
शिळे अन्न ती एकटीच खाते
दुधाचा प्याला आम्हा देऊनी
तृप्तीची ढेकर मग ती घेते
ताप असल्यास ही कामे करते
काम करून मग आराम घेते
आमच्या तापात जवळ असते
हात, पाय ,डोके दाबून देते
फाटकी चोळी शिवण घालते
नवा सदरा आम्हास आणते
सांगा मित्रांनो ही कोण असते
अशी आपली आईच असते
