लेक
लेक
1 min
836
कळतं नाही तिचे रूपे
लेक बनून कुशीत येते
मातृत्वाची जाणीव देते
मैत्रीण बनून जवळ येते
सुख-दुःखाला वाटून घेते
ताई होऊन सांभाळ करते
रस्ता ओलांडताना हात धरते
मी रुसली कि पप्पीच घेते
आई बनून घास भरवते
पाय दुखता दाबून देते
आजी होऊन ज्ञानच देते
ताप आल्यास औषध देते
सासू होऊन धाक दाखवते
कामाची ती तऱ्हा शिकवते
कधी वाटते मज लेकी ह्या
अष्टभुजांची मां शक्ती असते
