STORYMIRROR

Shital Yenaskar

Classics Others

3  

Shital Yenaskar

Classics Others

आई

आई

1 min
493

सुचेना मज काय लिहू

थोरवी गाऊ कुण्या आईची

भारतमाता की मातृभूमीची

जन्मदात्री की गंगामाईची


चोचीने भरवी पिल्यास

दाणा त्या चिमणीची

खाई तीज पिल्लेच तिला

अशा विषारी विंचनीची


मां शक्ती की मां विद्येची 

वासरास चाटत्या गाईची 

अनेक माता माझ्याभोवती

सुरेख रचना वात्सल्याची


 जन्मदात्रीती माझी आई

 वेदनेत मम तीच रडायची

 समोर असता ती माझ्या

 गरज मज ना देवाची

 

आई माझी माझी आई

हाक देता मी मायेची 

तत्परतेने धावत येईल

काळजी तिज बाळाची


वंदनीय या सगळ्या माता

साक्षात प्रतिमा देवाची

अश्रू सुमन आईस अर्पिते 

ऋणी तिची सात जन्माची


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics