STORYMIRROR

Mangesh Jadhav

Tragedy Others

3  

Mangesh Jadhav

Tragedy Others

दोन इटा आजून ठेवा साहेब....

दोन इटा आजून ठेवा साहेब....

2 mins
13.7K


डोक्यावर दोन इटा आजून ठेवा साहेब

आज माझ्या लेकरानं

खेळणी मगितलीत माझ्याकडं.

तुटली तर तुटू दया माझी मान

पण सांच्याला खेळणी देण्याचा

सबूद दिलाय मी तिच्याकडं

" बाबा मला खेळणी आणा ना ! "

हे शब्द कानावर पडताच

चर्रर्र,, झालं काळीज ह्या अभागी बापाचं,

आणि काचेसारखा चुरचुर झालो.

त्यात गरिबीनं खुटा रोवल्यामुळे

फुटकी दमडी सुद्धा नव्हती माझ्याकडं ,

तरीही लगबगीने मी फाटक्या सदऱ्याचे

खिसे चाचपून पाहिले,

पण खिश्यांना सुद्धा खालच्या बाजूने

मोठं घबदाड पडलेलं होतं..

बाबा खिसे का म्हणून चाचपतायत हे

केविलवाण्या नजरेनं बघत होतं माझं लेकरू

 आणि कोण जाणे कुठून एवढी

समज आली तिच्यात

की, " बाबा नको मला ती खेळणी "!

'आवंढा गिळत' रडक्या आवाजात

उद्गारलं माझं वासरू ...

तिच्या बोलक्या डोळ्यांचे काठ

क्षणार्धात पाणावलेले पाहून,

मी मात्र स्वतः ला सावरू शकलो नाही .

दाटुन आला गळा आणि,

टिपकारली ह्या कठोर बापाची आसवं. 

चेहरा ओंजळीत घेउन मुका घेतला

तिच्या आसवांनी खारट झालेल्या गालांचा.

आणि स्वतःशीच म्हणलो की,

आजपतूर दोन यळच्या तुकड्यासाठी राबत व्हतो

पण आज काहीतरी

मागीतलय लेकरानं म्हणून मी राबणार ,

वेळेला मुठीत कैद करून

हातातलं फडकं गुंडाळलं डोक्याला,

आणि निघालो पुन्हयांदा ,

त्या इटांच्या भट्टीवर ,

   फक्त माझ्या लेकरासाठी

डोक्यावर इटांचा थर लावतांना ,

साहेबांला गर्वाने म्हणलो की,

डोक्यावर दोन इटा आजून ठेवा साहेब

    आज माझ्या लेकरानं

खेळणी मगितलीत माझ्याकडं.

   

.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy