आईसाठी एवढं कर
आईसाठी एवढं कर
जन्मदात्या आईचे बाळा
देवाआधीही पाय धर.
तिजचरणी नमवूनी माथा
जोडूनी तू दोन्ही कर.
संकटांना तोंड देवूनी
झटली ती आयुष्यभर
आनंदाने तिच्याच नावे
आयुष्य तुझे तू कर.
नको भरकटू उनाड रे
बस, नाव तिचं तू मोठं कर
कसा शिकून मी मोठा झालो?
प्रश्न असा तू स्वत:स कर
नको रागवू वेड्या तिजवर
वृद्धापकाळी चुकली जर
घडविण्यास तुजला ती झिजली
कष्ट तिचे ते ध्यानी धर
सुखी ठेवण्या माय माउली
दुःखावर ही मात कर
कितीही आलं वादळ मोठं
आभाळागत प्रेम कर.
कितीही आलं वादळ मोठं
आभाळागत प्रेम कर.
