STORYMIRROR

Mangesh Jadhav

Tragedy

3  

Mangesh Jadhav

Tragedy

वार्धक्याची काठी

वार्धक्याची काठी

1 min
434

आयुष्य पणास लाविले, फक्त तुझ्यासाठी

हो रे बाळा आधाराला, वार्धक्याची काठी ||धृ||


वर्षाकाठी एकच सदरा

फाटली रे धोती

अनवाणी हयात गेली

तुडवून माती

कधी काही कमी न पडता, दिधले तुझ्यासाठी

हो रे बाळा आधाराला, वार्धक्याची काठी ||१||


वृद्धाश्रमी माझं म्हणाया

इथं कुणी नाही

दाही दिशा बाप लेकरा

वाट तुझी पाही

का रे राजा दूर लोटलं, जन्म घेवून पोटी

हो रे बाळा आधाराला, वार्धक्याची काठी ||२||


खुप साहिले रे बाळा

उभ्या आयुष्यात

उन्हातान्हात रक्त आटविले

तुझ्या विचारात

त्राण नाही उरला जाहल्या, रक्ताच्या रे गाठी

हो रे बाळा आधाराला, वार्धक्याची काठी ||३||


तुझ्याविना जग हे भासते

सुने सुने बाळा

सांग कधी परतून नेशी

माझ्या लडिवाळा

नको तुझी धन-दौलत दे, भुकेपाई रोटी

हो रे बाळा आधाराला, वार्धक्याची काठी ||४||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy