माझी मैत्रीच जिंकली
माझी मैत्रीच जिंकली
आज मि पाहिले पुन्हा मैत्री काय असते ती
कोरोनापूढे पुन्हा एकदा माझी मैत्रीच जिंकली !!
आज एकाएकी ती, पडली चक्कर येऊन
कुणी नाही आले जवळी, मित्र आला धावून
नाही मिळे डॉक्टर, नाही मिळे वाहन
कसे नेऊ तिला मी, आता तपासण्यास
काय करू आता मला, काहीही कळेना
खांद्यावरती हात ठेऊनी, मित्र म्हणाला "मी आहे ना"
नेले तिला कसेबसे, रुग्णालया समोर
पाहताची तिला डॉक्टर, म्हणती "नाही काही हातात"
म्हणती करुनी ऍडमिट, देतो को-विड सर्टिफिकेट
नमस्कार करुनी येथूनच, सर्व व्हा आता कॉरंटाईन
नाही असे तिजला, सर्दी, खोकला, ताप
नाही कधी झाला, श्वास घ्यावयास त्रास
मग कसे म्हणती को-विड ते, न करिता चेकअप
मित्र म्हणे मजला, कशाला तू भितोस
आहे माझा ओळखीचा, अजून एक डॉक्टर
आली आता वेळ, घ्यावयाचा शेवटचा निरोप
वाट पाहुनी डोळे थकले, नाही आले कोणी नातेवाईक
सगे-सोयरे, बंधू आणि आप्त,
कुणीही नाही आले तिला खांदा द्यावयास
सांगा कसे नेऊ मी आता तिला, वैकुंठभूमीस
मग झाला तिचा प्रवास सुरु, माझ्या मित्रांच्या खांद्यावरूनच
म्हणती आपले गाव, आपली भावकी एक
कुठे हरवली तुमची माया, आणि तुमची जवळीक
वाटे आपले आप्त येतील, दहावे - बाराव्यास
न आले या वेळेसही कुणी, माझ्या मित्रांशिवाय
वेळच अशी आहे की, नाही धरिला कुणावर राग
कितीही सांगितले ओरडूनी नाही झाला को-विड, कोण ठेवणार विश्वास
मित्रांना मात्र नाही लागले, काहीही सांगावयास
काहीही न विचारता ते आले, तिच्या सर्व कार्यांस
घाबरूनी को-रोनासी, नाही कुणी आलं
म्हणुनी काय बाकी राहिले तिचे, करावयाचे काही कार्य
जरी नसे कुणी तरी, मित्र होते माझ्या जवळी
माझ्या डोळ्यांनी मि पाहिले, कोरोनाला हरवले माझ्या मित्रांनी!!
आज पाहिले मी मी पुन्हा कोरोना पूढे माझी मैत्रीच जिंकली
आज पाहिले मी मी पुन्हा कोरोना पूढे माझी मैत्रीच जिंकली !!!!
