तुला पाहता आजही...
तुला पाहता आजही...
कधी-कधी इंस्टाग्रामवरती तुझा फोटो पाहतो,
त्या फोटोला लाईक न करता निघून जातो,
सायंकाळी एकटा असताना तुलाच मी आठवतो,
तुला पाहता आजही, मी भान माझे हरवतो
मी माझ्या कामानिमित्त रस्त्यावरून वाट चालतो,
अचानकपणे मी तुलाच माझ्या समोर पाहतो,
तुझ्या डोळ्यात डोळे मी आजही मिळवतो,
तुला पाहता आजही, मी भान माझे हरवतो
फेसबुकवरती तुझ्या स्टोरीज मी पाहतो,
व्हाॅट्सॲपला दररोज तुझा डि.पी. बघतो,
तुझा मोबाईल नंबर माझ्या ध्यानात बसतो,
तुला पाहता आजही, मी भान माझे हरवतो
तुझ्यासोबत मी नेहमी सामान्यपणे बोलतो,
एकेरी प्रेम जरी असले तरी ते भावंडांमध्येच ठेवतो,
शब्दांमधून मात्र ते मी उत्स्फूर्त व्यक्त करतो,
तुला पाहता आजही, मी भान माझे हरवतो
तुझ्यावरती लिहीलेल्या चारोळ्या मी अनुभवतो,
तुझा तो गोड आवाज माझ्या कानात खेळतो,
आभाळातही मी तुझाच चेहरा पाहतो,
तुला पाहता आजही, मी भान माझे हरवतो
तुझ्यावरती मी असंख्य कविता लिहितो,
अनेक पंक्ती मी तुझ्यावरतीच रचतो,
माझ्या काव्यसंग्रहास तुझे नाम देतो,
तुला पाहता आजही, मी भान माझे हरवतो
तुला पाहता आजही, मी भान माझे हरवतो,
कामाच्यावेळेसही मी तुझा चेहरा आठवतो,
तुझ्या आठवणींमध्ये अक्षरक्ष: आभाळही रडतो,
शेवटी तुला पाहता पाहता मी माझे जीवन घालवतो

