STORYMIRROR

Harshal Patil

Tragedy

3  

Harshal Patil

Tragedy

बळीराजा_

बळीराजा_

2 mins
230

सारे विश्व निर्मिले तु हेचि देवा!, 

तुझी माफी कशी-कशी मी मागू रे!, 

ही सारी पापं-दुष्कृत्ये आमचीचं होती देवा!, 

परंतु त्या बळीराजाचा जीव जाताना आता मी कसा बघू रे?

एक विचार अंतरंगी कल्पूनी देवा,तु हे विश्व निर्मिलेस, 

परंतु त्या विचारामागील सारा दृष्टीकोनचं आम्ही बदलून टाकला रे!,

माणसांमधली माणुसकीचं शिल्लक राहिली नाही आता, 

तर मग का म्हणून,माणूस म्हणून जगण्याचा हा हक्क आम्ही सर्रासपणे स्वीकारून टाकला रे? 

खरचं,बळीराजावर होणाऱ्या या साऱ्या अत्याचारांचं मूळ आम्हीचं देवा!, 

एक माणूस म्हणून त्याच्या हिताचा साधा विचारही आम्ही कधी केला नाही रे!, 

शेतसारा पद्धतीने अख्खा भारत लुटून काढला, 

गिळणारे तर गिळून तृप्त झाले,परंतु माझा बळीराजा मात्र कधी सुखाने हसला नाही रे? 

शेतमालाला योग्य भाव मिळावा म्हणून अपार कष्ट हा सोसतो देवा!, 

परंतु नेहमीसारखीचं इकडे आड तर तिकडे विहीर अशी केविलवाणी परिस्थिती याची असते रे!, 

"शेतकऱ्यांचा विकास होणार","अच्छे दिन आएेगे" यांची स्वप्ने पाहता-पाहता पार केस पांढरे होऊन जातात देवा माझ्या या बळीराजाचे,

एवढं सारं होऊनसुद्धा,तरीही माझ्या बळीराजाच्या कपाळावरची एकसुद्धा आठी इकडची तिकडे होत नसते रे! 

अामदार-खासदारकीचा फायदा लुटत जमिनी लुटून अब्जाधीश यांनी व्हायचं देवा!, 

परंतु माझ्या या बळीराजाचं पोट भरेल याकरिता न्याय मिळवून देणारं एकही सरकारी कलम लागू करायचं नसतं का रे?, 

मोठ-मोठया बापांची ही लेकरं देवा,ते तर ते पण ते कर वसूलदार पण तसेचं रे देवा!, 

म्हणूनचं तर ऊस गोड लागला म्हणून मेजाखालतून लाच घेऊन बळीराजाला असं कधी लुटायचं असतं का रे? 

साऱ्या जगाचा पोशिंदा हा बळीराजा देवा!, 

तो करतोय म्हणून आपण साऱ्या नेत्यांनी असचं निवांत बसायचं असतं का रे?, 

निव्वळ आणि निव्वळ स्वतः च्या त्या लालसेपोटी, 

आपल्याचं बांधवांना असं कधी गिळायचं असतं का रे? 

विकसनशीलतेच्या प्रगतीपथावर आहे म्हणे देश, 

असं म्हणून भ्रष्टाचार रूपी तो कीडा कधी ज्वलंत तेवत ठेवायचा असतो का रे?, 

न मोठ्या गर्वाने आम्ही मातृभूमीचे सेवक म्हणून बाणा मिरवतात,

देवा मला तूचं एक सांग,बळीराजाला न्याय वा सम्मान मिळवून देणारा एकही जण आज या भूतलावर अस्तित्वात नसतो का रे?

सारं आयुष्य असचं ससेहोलपट करून घालवतो हा माझा बळीराजा, 

दोन जोडी कपडे आणि ५६ काय ११२ इंच छाती फुगेल असा ईमानीपणा या दोहोंची सांगड याच्याकडे असते रे!, 

आपल्या साऱ्या पोरा-बाळांना योग्य मार्गावर लावून मोकळा श्वास घ्यायला तयार असतो हा बळीराजा, 

परंतु त्या अंतिम क्षणी सोबतीला बायको मात्र वाचलेली नसते रे! 

ही अशी गलिच्छ,दळभद्री कर्म आमची देवा!, 

या कोरोनारूपी सावटात माझी व्यथा मी तुला आता कशी सांगू रे?, 

सारा छळ,अत्याचार,लुट-मार आम्हीचं केली देवा!, 

आता तूचं सांग देवा!,कोणत्या तोंडाने केलेल्या दुष्कृत्यांसाठी त्या बळीराजा कडे ती भिक कशी मी मागू रे?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy